माबुद खान
तालुका प्रतिनिधी जिंतूर
जिंतूर: जयपूर ते मुंबई रेल्वेत झालेल्या गोळीबार हल्ल्यातील आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी, तसेच मेवात मध्ये मज्जिदच्या इमाम हाफिज साद यांच्या खून प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी मुस्लिम सेवा संघाच्या वतीने करण्यात आली आहे.मुस्लिम सेवा संघाच्या वतीने शहरातील नेवाती मोहल्ला ते तहसील कार्यालय मोर्चा काढण्यात आला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. या निवेदनावर मुस्लिम सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत. यावेळी मोर्चात अनेक मुस्लिम समाज बांधव सहभागी झाले होते.








