काशिफ़ अंसारी
तालुका प्रतिनिधी, पालघर
पालघर : बोईसर खैरेपाडा अंतर्गत आस्पन बिल्डिंग सोसायटीचे मीटर अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना जनशक्ती आदिवासी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. महेश धोडी यांनी बोईसर एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.सोसायटीतील विद्युत मीटर चोरीची ही पहिलीच घटना असून, यासंदर्भातील पहिली तक्रार महेश धोडी यांनी पोलीस ठाणे, ग्राहक मंच व अन्य शासकीय अधिकाऱ्यांकडे केली आहे.महावितरणचे किंवा संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाची सखोल चौकशी करून मीटर चोराला अटक करून चोरीचा गुन्हा दाखल करतील का? आता चोरटेही मीटर सोडत नाहीत.संबंधित तक्रारीत नमूद कार्यालयातून न्याय न मिळाल्यास लोकशाही मार्गाने बेमुदत संप किंवा उपोषण करणार असल्याचेही सांगण्यात आले आहे, असे महेश धोडी यांनी सांगितले.


