प्रकाश केदारे
तालुका प्रतिनिधी, पाथरी
आज दि.८-८,२०२३ मंगळवार रोजी पाथरीतील सर्व हिंदू समाज बांधवांच्या वतीने मुख्याधिकारी नगरपरिषद पाथरी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात असे म्हटले आहे की पाथरी शहरामध्ये बऱ्याच काही लोकांचे गोवंश आहेत हे गोवंश लोकांनी रस्त्यावर मोकळे सोडलेले आहेत ह्या गोवंशापासून वृद्ध, बालक, स्त्रिया, यांना त्रास होतो आणि हे गोवंश शहरातील मुख्य रस्त्यावर भांडणे खेळतात त्यावेळी हे भांडताना लोकांच्या अंगावर पण जातात आणि हे गोवंश पाथरीतील मुख्य रस्त्यावर पण फिरत असतात विशेष ह्या वंशाचा वावर बस स्टॅन्ड रोडवर बराच असतो मुख्य रस्त्यावर हे गोवंश बसतात म्हणून वाहतुकीला खूप अडचण निर्माण होत आहे ,वाहन चालवताना वाकडे तिकडे या गोवंशाला चुकवीत चालवावे लागतात काही गुण त्यांना हाकारले तर ते सरळ माणसावर साल करतात काल-परवाच असेच एका वाहनाच्या धडकेनेदि.२८-७ -२०२३ रोजी रात्री ८-३०एका गो वंशाचा मृत्यू झाला. रस्त्यावर फिरणारे सर्व गुण हे मोकार नसून लोकांच्या मालकीचे आहेत. ह्या गोवंशाचे मालक यांना रस्त्यावर मोकळे सोडत आहेत. या ७ दिवसात सदरील गोवंश व गाईंचा बंदोबस्त करावा नसता या गाई व गोवंश गो शाळेत पाठवल्या जातील. तसेच पाथरी शहरातील राष्ट्रीय महामार्ग ६१ वर व शहरातील मेन रोड वर बरेच अतिक्रमण होत आहेत जे अतिक्रमण झाले आहेत. ते त्वरित हटवण्यात यावेत व या अतिक्रमणामुळे रस्त्यावरील जाणाऱ्या येणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.वाहन चालकांना पण त्रास होत आहे. छोटे मोठे एक्सीडेंट पण होत आहेत .तरी या ७ सात दिवसात सर्व अतिक्रम करणाऱ्या वर योग्य ती कारवाई करून त्वरित अतिक्रमण हटवावेत अशी मागणी पाथरी शहरातील सर्व हिंदू समाज बांधवांच्या वतीने नगरपरिषद मुख्याधिकारी पाथरी यांना लेखी निवेदन देऊन मागणी करण्यात आलेली आहे.