माबूद खान
तालुका प्रतिनिधि जिंतूर
जिंतूर: तालुक्यातील मालेगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या स्थापना दिनानिमित्त आज बुधवारी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्यांना खाऊ व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.मालेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची स्थापना २ ऑगस्ट १९६० रोजी झाली आहे. आज शाळेचा स्थापना दिवस असल्याने शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने स्थापना दिनानिमित्त विद्यार्थ्यांना खाऊ व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश वाकळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सखाराम गाडेकर, सरपंच सचिन राठोड, तंटामुक्ती अध्यक्ष आसाराम काळे, ग्रामपंचायत सदस्य परसराम थिटे यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाल सानप यांनी केले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदीप साबळे, शिवाजी साबळे, वैभव रोकडे, विशाल दुभळकर, शिवम मूलंगे नारायण साबळे, आदींनी परिश्रम घेतले.











