संजय भोसले
तालुका प्रतिनिधी,कणकवली
तळेरे येथील स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट आणि स्व. सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालयाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी घेण्यात आली. यावेळी सर्व सभासद आणि कार्यकारिणी सभासद उपस्थित होते. या वार्षिक सर्वसाधारण सभेची सुरुवात सूर्यकांत तळेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने तर बापू महाडिक यांच्या हस्ते सुनील तळेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश तळेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत तळेकर, वाचनालयाचे अध्यक्ष विनय पावसकर, सचिव मिणेश तळेकर, डॉ. अभिजित कणसे, राजेश जाधव, नितीन तळेकर आदी उपस्थित होते. यावेळी वाचनालयाची सभा अध्यक्ष विनय पावसकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी सचिव मिनेष तळेकर यांनी वार्षिक अहवाल, जमा खर्च, अंदाजपत्रक आणि मागील इतिवृत्त वाचन केले. तर ट्रस्टची वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष सुरेश तळेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच, वाचनालयाच्या स्वतः च्या इमारत बांधकाम करण्याबाबत चर्चा करण्यात आली. शेवटी मिनेश तळेकर यांनी आभार मानून सभा संपली. यावेळी दिलीप तळेकर, शशांक तळेकर, मनोज तळेकर, सतीश मदभावे, राजू पिसे, अशोक तळेकर, ग्रंथपाल साक्षी तळेकर यांच्यासह सभासद उपस्थित होते.