श्री.दशरथ गायकवाड
तालुका प्रतिनिधी, मेहकर
सिद्धांत आश्रम वरवंड द्वारा संचालित सिद्धांत आश्रम प्राथमिक आश्रम शाळा वरवंड येथे दिनांक 31 .07.2023. रोज सोमवारला टॅब वितरण सोहळा नवनियुक्त झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिद्धांत आश्रम वरवंड संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य भगवान महाराज होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मेहकर विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार डॉक्टर संजय रायमुलकर महादेव जाधव संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई सुपाजी पायघन माजी उपसभापती पंचायत समिती मेहकर नागेश डांगे सरपंच गजानन राठोड उपसरपंच वरवंड सुभाष बोराडे सरपंच नायगाव देशमुख रोहिदास जाधव सरपंच पती पाथर्डी सहदेव आल्हाट माजी उपसभापती शेषराव राठोड संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मेहकर दिलीप नवत्रे शिवसेना शाखाप्रमुख देऊळगाव साखरशा. प्रकाश राठोड माजी सरपंच कुटी श्रीकृष्ण कोळसे माजी सरपंच बोथा त्याचप्रमाणे वरवंड येथील प्रतिष्ठित नागरिक शाम जोशी, विनोद राठोड ,दिलीप राठोड, दिलीप नेमाडे आणि बरेच माजी विद्यार्थी उपस्थित होते. सिद्धांत आश्रम वरवंट चे संचालक बळीरामजी मुके डॉक्टर आभाळे साहेब तुकाराम भजन विठ्ठल महाराज,कष्ट अनिल शेवाळे हे सुद्धा उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात वृक्ष पूजनाने करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्यध्यापक देवेंद्र पद्मने सर यांनी केले. इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे विनामूल्य प्राप्त झालेल्या त्याचा वापर करून मुलांना स्वतः शिकण्यास प्रेरित करून त्यांच्या शिकण्यात तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करता येईल व जागतिक दर्जाचे भविष्यवेधी शिक्षण विचार याबाबत विचार व्यक्त केले माननीय आमदार डॉक्टर संजय रायमुलकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना त्या वितरित करण्यात आले. याप्रसंगी
सिद्धांत आश्रम प्राथमिक आश्रम शाळा वरवंडचा माजी विद्यार्थी नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षक गोपाल नारायण सोंडकर व सुवर्णा दिगंबर इंगळे रूपाली दिनकर चव्हाण यांचा सहकुटुंब सत्कार करण्यात तर संजय रायमुलकर यांनी विद्यार्थी व पालकांसोबत ही खूप साधक यशोगाथा विद्यार्थ्यासमोर भाषणातून व्यक्त केली चर्चा केली व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तीन ऑगस्ट रोजी संजयजी रायमुलकर यांचा वाढदिवस आहे. यांचे अवचित साधून साहेबांना पुष्पहार तथा मिठाई भरून शुभेच्छा देण्यात आल्या व महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा देण्यात आली या कार्यक्रमाचे संचालन संदीप राठोड यांनी केले तर आभार प्रदर्शन गणेश लाड यांनी केले कार्यक्रमाचे साठी सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.