निशांत मनवर
शहर प्रतिनिधी,उमरखेड.
उमरखेड : राष्ट्रपिता महात्मा गांधी व थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बद्दल बेताल वक्तव्य करुन सामानिक भावना दुखविणाऱ्या शिवप्रतिष्ठाणचे अध्यक्ष संभाजी उर्फ मनोहर भिडे कुलकर्णी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीचे निवेदन येथील सामाजिक संघटनांच्या वतिने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे उपविभागिय अधिकार्यांमार्फत पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. शिवप्रतिष्ठाणचे अध्यक्ष संभाजी उर्फ मनोहर भिडे (कुलकर्णी ) यांनी आपल्या जाहिर सभेतून भारतियांचे प्रेरणास्थान असलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी व थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बद्दल बेताल वक्तव्य करून महापुरुषाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविले आहेत.ऐवढेच नाही तर भारताचे संविधान ‘ राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज, संविधानाने दिलेले सर्वधर्म समभाव, या देश्याचे स्वातंत्र्य मला मान्य नाही अश्या प्रकारच्या त्यांच्या वक्तव्याने सामाजिक भावना दुखावल्या असल्याने त्यांच्या सर्वत्र विरोधात संताप व्यक्त होत आहे.राष्ट्रपुरुषांचा अनादर करून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयल केल्या बद्दल संभाजी उर्फ मनोहर भिडे कुलकर्णी यांचे विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा असे उपविभागिय अधिकारी यांचे वतिने नायब तहसिलदार सुभाष पाईकराव यांचेमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठनिवेदनात म्हटले आहे.या निवेदनावर म.ज्योतिबा फुले स्मारक समितीचे अध्यक्ष प्रा.डॉ.अनिल काळबांडे, शैलेश अनखुळे, प्रकाश मत्ते, बाबाराव अनखुळे, सुभाष मत्ते, संतोष निथळे, विरेन्द्र खंदारे, प्रा गजानन दामोदर, बाबाराव अनखुळे, गंगाधर मत्ते, गोपाल कानडे , भिमराव सोनुले, रमेश अनखुळे, संदिप अनखुळे, संतोष मत्ते, अरुण अनखुळे, सारनाथ रोकडे, पी. एम.नवसागरे यांच्यासह पुरोगामी संघटना व असंख्य माळी समाज बांधव यावेळी उपस्थित होते.
चौकट-भारत हा सर्वधर्म समभाव जोपासणारा लोकशाही मार्गाने प्रगती करणारा विश्वातला ऐकमेव देश आहे.विविधतेत एकता हे आपल्या देशाचे वैशिष्य आहे अनेक महापुरुषांसह स्वातंत्र्य सैनिकांच्या बलीदानातून या देश्याला स्वातंत्र्य मिळाले असतांना भिडे सारख्या व्यक्तीने देशद्रोही व्यक्तव्ये करणे निषेधार्थ आहे शासनाने अश्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करून कठोर कारवाई करावी – प्रा.डॉ.अनिल काळबांडे, अध्यक्ष क्रांतीसुर्य महात्मा फुले स्मारक समिति, उमरखेड