योगेश्वर शेंडे
उपजिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर
नागभीड (१५ जुलै)- नागभीड तालुक्यातील कोसंबी गवळी येथील ग्राम पंचायतीने सन 2020-2021 च्या स्वउत्पन्नातून महिला व बालकल्याण विकास योजनेच्या 10 टक्के निधीतून अंगणवाडी क्र.1 व अंगणवाडी क्र. 2 येथील मुलामुलींना संजय गजपुरे जि.प.सदस्य यांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले. तसेच दिव्यांग व्यक्ती सांदीपाणी अजय पिलारे,बळीराम श्रीहरी भरडे या दोन व्यक्तींना 5 टक्के निधीतून 2 व्यक्तींना 1 ड्रेस 1 मच्छरदाणी व 1 छत्री देण्यात आली. या कार्यक्रमाला दिलीप रंदये सरपंच ग्रा.पं. कोसंबी गवळी, संदीप हेमने उपसरपंच, कैलास रंदये ग्रा.पं. सदस्य,शिल्पा धोंगडे, ज्योतीताई उईके, मुळनकर ग्राम सेवक, श्री पाटील वनरक्षक, मच्छीद्र चांनोडे माजी सरपंच, गुरुदास नागापुरे, चतुराबाई दडमल, रूपा दडमल, अंगणवाडी सेविका, तथा मदतनीस आदी कार्यक्रमाला उपस्थित होते.











