पवनसिंग तोडावत
ग्रामीण प्रतिनिधी अंधानेर
कन्नड: महाराष्ट्रातील सर्व संतांच्या पालखी सोहळ्यांना व धार्मिक,अध्यात्मिक कार्यक्रम सुरू करण्याची परवानगी दयावी अशी मागणी कन्नड तालुका वारकरी संप्रदायांच्या वतीने सोमवारी तहसीलदारांना निवेदनाव्दारे केली.महाराष्ट्रांत सांस्कृतिक जडणघडणीमध्ये वारकरी संप्रदायाचा फार मोठा मोलाचा वाटा आहे. वारकरी संप्रदायातील नित्य साधना वारी ,भजन,कीर्तन या कार्यक्रमास शासनाने कोरोनाचे सर्व नियम पळून सुरू करण्यास परवानगी दयावी. बंडातात्या कराडकर यांची स्थानबद्धतेतून मुक्तता करावी. धार्मिक व पारंमपारिक कार्यक्रम व संतांची पालखी सोहळे मंदिरे उघडण्यासाठी व भजन कीर्तन कार्यक्रमास परवानगी द्यावी आदी मागण्या निवेदनात केल्या आहे.या वेळी विठ्ठल महाराज शिंदे,कृष्णा महाराज चव्हाण,अशोक महाराज बारगळ,सुरेश महाराज आढाव,सागर महाराज काचोले,कृष्णा महाराज मोकाशे,काकासाहेब महाराज निकम,राजेंद्र महाराज दांडगे,कृष्णा महाराज पवार,नागश महाराज मांजरे,ज्ञानेश्वर महाराज गोरे,प्रवीण महाराज घुगे,उध्दव महाराज राऊत आदि महाराज मंडळी उपस्थित होते.











