राजअनिल पोचमपल्लीवार
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
अहेरी – आज दिनांक 15 जुलै ला अहेरी येथे राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या वतीने आदिवासी समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात धरने प्रदर्शन करून तहसीलदार अहेरी मार्फत महामहिम राष्ट्रपती निवेदन देण्यात आले.
आजचे हे धरना प्रदर्शन भारतातील संपूर्ण तालुक्यात एकाचवेळी एच.एन.रेकवाल राष्ट्रीय अध्यक्ष तथा प्रेमकुमार गेडाम राष्ट्रीय संयोजक यांच्या नेतृत्वात, मधुकर जग्गाजी वेलादी शिवणीपाठ, बंडू संन्याशी शेडमाके रायपूर, रमेश लचमा पेंदाम रामपूर, शैलेश नागेश्वर वेलादी शिवणीपाठ, विलास दशरथ मडावी गुंडेरा, दादाराव मडावी पोलीस पाटील खमणचेरु, मलेश तलांडे शिवणीपाठ, बंडू पोच्या कुसनाके शिवणीपाठ, श्रीहरी मुन्ना आलाम महागाव खुर्द, मधुकर यशवंत सेडमाके आदी उपस्थित होते. राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद हे संविधानिक मार्गाने आदिवासी समाजाच्या हक्क, अधिकाराची तसेच अस्तित्वाची लढाई संपूर्ण देशभरातील लोकांना जागृत आणि संघटित करून लढत आहे. राष्ट्रव्यापी चरणबद्ध आंदोलनाचा हा दुसरा टप्पा होता. 29 जुलै ला भारतातील संपूर्ण जिल्ह्यात आदिवासी समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात एकाचवेळी विशाल रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी सर्व समाजबांधवांनी सहभागी होऊन एक आवाज निर्माण करावा असे आवाहन राष्ट्रीय आदिवसी एकता परिषद वतीने करण्यात आहे.