रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी, तेल्हारा
तेल्हारा : गेल्या दोन वर्षांपासून हिवरखेड व परिसरात गाजत असलेला हिवरखेड नगर परिषदेचा मुद्दा निकालात निघाला असून आज विधिमंडळात मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवरखेड नगर परिषदेची अधिकृतघोषणा केली.या घोषणेमुळे नगर पंचायत ऐवजी मी हिवरखेड नगर परिषद करून आणेल ही आमदार प्रकाशभाऊ भारसाकळे यांनी हिवरखेड वासीयांना दिलेले आश्वासन पूर्ण केले असून यामुळे हिवरखेड वासीयांमध्ये आनंदाची लहर निर्माण झाली असून आमदार प्रकाशभाऊ भारसाकळे यांच्यावरील लोकांचा विश्वास वाढलेला आहे व शब्दाला जागणारा व आश्वासनाची पूर्तता करणारा नेता म्हणून त्यांची जनमानसात प्रतिमा निर्माण झाली आहे.नगर पंचायतीच्या मुद्द्यावरून त्यांच्या काही राजकीय विरोधकांनी त्यांना बदनाम करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला व भारसाकळे हेच नगर पंचायतीला आड काठी निर्माण करीत असल्याचा वावड्या उठविल्या परंतु आजच्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने दूध का दूध व पाणी का पाणी सिद्ध झाले.नगर पंचायत झाल्यास हिवरखेडला विशेषफायदा होणार नाही परंतु नगर परिषद झाल्यास मात्र हिवरखेडचा झपाट्याने विकास होईल यामुळे मी नगर पंचायतीच्या नव्हे तर नगर परिषदेच्या बाजूचा आहे पण त्यासाठी काही वाट पाहावी लागेल अशी भूमिका आमदार भारसाकळे यांनी घेतली होती. व आज त्यांनी नगर परिषद करून दाखवली यामुळे विरोधक तोंडघशी पडले असून आमदार भारसाकळे यांचे वजन मात्र वाढले आहे.आमदार भारसाकळे यांच्याबरोबर च आमदार साहेबांच्या काही कट्टर समर्थकांना सुद्धा पुरेपुर बदनाम करण्याचा सपाटा विरोधकांनी लावला होता परंतु या नगर परिषद निर्मितीच्या घोषणेने आमदार भारसाकळे यांच्या समर्थकांचे सुद्धा वजन वाढले आहे.