शेख इरफान
जिल्हा प्रतिनिधि यवतमाळ
उमरखेड – बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी साहब खासदार व राष्ट्रीय अध्यक्ष, इम्तियाज जलील साहब खासदार व महाराष्ट्र अध्यक्ष, डॉ. गफ्फार कादरी साहब महाराष्ट्र कार्याध्यक्ष, फिरोज लाला साहब मराठवाडा अध्यक्ष यांच्या सूचनेवरून मणिपूर राज्यात सलग ७७ दिवस कुकी (निशन) समाजावर मैथाई समाजाच्या वतीने होत असलेले अत्याचार थांबवून आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी उमरखेड विभागीय अधिकारी मार्फत राष्ट्रपतींना उमरखेड एम आय एम पक्षाचे पदाधिका-याकडून निवेदन देऊन करण्यात आली. यावेळी तालुका युवा अध्यक्ष अजिज पटेल, माजी जिल्हाध्यक्ष सय्यद इरफान, माजी नगरसेवक सय्यद अफसर, माजी नगरसेवक सरासूल पटेल, माजी न प प्रतिनिधी सय्यद अंसार माजी न.प. प्रतिनिधी इरफान नदी, इनायत भाई, वजाहत मुजावर, अस्लम भाई, अजीम भाई, मुजम्मिल जनाब, अकील कुरेशी, अहमद पटेल, सय्यद अकील, इमरान भाई, सय्यद फराज, अमन पठान उपस्थित होते.


