भगवान कांबळे
तालुका प्रतिनिधी, माहुर
माहुर : तालुक्यात अतिवृष्टीमुळे गुरे ,ढोरे,घर,शेती इत्यादींचे अतोनात नुकसान झालेले मौजे माहादापुर येथील महिला मंडळ, नागरिकांनी बुधवार दिनांक २६, रोजी मान्यनीय तहसीलदार साहेबांना पुरग्रस्त महादापुर वासी आपल्या व्यथा व नुकसान सांगत असतांना अचानक ज्योतीबा खराटे यांची भेट झाली ज्योतीबा खराटे हे शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख असल्याने यांना पुरग्रस्त महादापुर महीला मंडळ नागरिकांनी अतिवृष्टीने बेघर झाल्याची माहिती सांगितली. आम्हाला सध्या कशाचीच सोय नाही मान्यनीय तहसीलदार साहेबांनी उद्या मदत मिळेल असे आक्ष्वाशन दिले परंतु आमची आजची सुध्दा सोय नाही घरी काहीच नाही असे सांगत असतांनाच ज्योतीबा खराटे यांनी लगेच किराणा किट तुम्हाला देतो थोडेसे थांबा व त्वरित आपल्या कार्यकर्त्यांना बोलावुन किराणा किट चे वाटप केले यावेळी उमेश जाधव तालुका प्रमुख शिवसेना,जलील भाई पडसा उप तालुका प्रमुख,निरधारी भाऊ जाधव शहर प्रमुख,दिपक कांबळे गट नेता,सौ.सुरेखाताई तळणकर युवती सेना तालुका प्रमुख, जितु चोले युवा सेना उपजिल्हाप्रमुख अक्षय वाघ युवा सेना तालुका प्रमुख,वशिम भाई युवा सेना शहर प्रमुख आशीर्वाद आढावे युवा सेना तालुका समन्वयक,जैष्ठ शिवसैनिक शक्ती ठाकुर, बालाजी तळणकर,विजेय मीरटकर, विजेय कांबळे, देविदास वानखेडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.