शेषराव दाभाडे
तालुका प्रतिनिधी,नांदुरा
संग्रामपूर तालुका भागात अतिवृष्टी झाल्यामुळे मोठ्यप्रमाणात घरातील साहित्य तसेच शेतातील पिके खरडून गेली आहे. पशूहानी सुद्धा झाली. चार दिवस झाले असून शासन व प्रशासन लोकांना मदत कार्य पोहचविण्यासाठी अपयशी ठरताना दिसून आले. या भागाची पाहणी करून निदर्शनास आले की अनेक भागातील नुकसानीचे पंचनामे सुध्दा झाले नाही. तत्काळ संग्रामपूर उपविभागीय दंडधिकारी व कृषि अधिकारी यांची भेट घेऊन. बनसोडे साहेब कृषि अधिकारी यांना समवेत घेऊन पूरग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच दिलिप खरात प्रदेशउपाध्यक्ष रिपब्लिकन सेना यांच्या वतीने पूरग्रस्तांना आकोली गावामध्ये धान्य व कपडे देण्यात आले. दिलिप खरात यांच्या समवेत जाऊन पूरग्रस्तांना एक हात मदतीचा दिला यावेळी , वंचित बहुजन युवक आघाडी जिल्हा सचिव रवि पहूरकर, अफसर कुरेशी नगर सेवक तथा विरोधीनेतेनगर पंचायत संग्रामपूर, राहूल शिरसोले, रशीद शेख, शिधांत सोनोने, कुणाल तायडे, .शाम भेलके, दिलीप वानखडे, उपस्थित होते


