सिध्दोधन घाटे
जिल्हा प्रतिनिधी बीड
बीड : दि. २७ जूलै २०२३ जिल्ह्यातील गेवराई शहरातील श्रीमंतयोगी अर्बन निधी लिमीटेड बॅंकेने ६०० ठेवीदारांची श्रीमंतयोगी निधी अर्बन मल्टीस्टेट लिमीटेड बॅंकेने शहरातील ठेवीदारांची फसवणूक करून पळून गेल्याची घटना समोर आली आहे.
बीड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या पतसंस्थानी आणि मल्टीस्टेट बॅंकांनी नागरीकांना फसवत नागरिकांची लुट केल्याच्या घटना उघड होत आहेत.गेवराई शहरातील श्रीमंतयोगी निधी अर्बन मल्टीस्टेट बॅंकेने शहरातील ठेवीदारांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. श्रीमंतयोगी निधी अर्बन मल्टीस्टेट लिमीटेड बँकेचे अध्यक्ष अजित काळे यांनी जिल्ह्यातील अनेक युवकांना स्पर्धा परीक्षांमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवत मी तुमच्या मुलांना वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरी लावतो माझ्या खुप ओळखी आहेत.असे सांगत कोट्यावधी रूपयांच्या ठेवी ठेवून घेतल्या नोकरीच्या देण्याच्या मोठमोठ्या गप्पा मारून जिल्ह्यातील अनेक युवकांना श्रीमंतयोगी निधी अर्बन बँक मल्टीस्टेट लिमिटेड मध्ये ठेवी ठेवण्यासाठी सांगून अजित काळे यांनी नोकरी तर दिलीच नाही परंतू युवकांनी बॅंकेत ठेवलेल्या कोट्यावधी रूपयांच्या ठेवी घेऊन पळ काढला. श्रीमंतयोगी निधी अर्बन मल्टीस्टेट लिमीटेड बँकेचे अध्यक्ष अजित काळे अनेक दिवसांपासून गायब झाल्याचे समजताच नागरीकांनी बीड येथील पोलिस अधीक्षक कार्यालयात गेवराई शहरातील श्रीमंतयोगी निधी अर्बन मल्टीस्टेट लिमीटेड बँक आणि बॅंकेचे अध्यक्ष अजित काळे यानी फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली असून घडलेला सर्व प्रकार ठेवीदारांकडून ऐकताच तुमच्या मुलांना अशा पध्दतीने नोकरी लावता का म्हणून कान उघाडणी करत जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांनी पहिला गुन्हा तुमच्यावर ठेवीदारांवर दाखल करतो असे म्हणत ठेवीदारांनी केलेल्या चुकीबद्दल चांगलाच चोप दिला.


