गणेश सवने
शहर प्रतिनिधी, सेलू
सेलू : दि २६ जुलै बुधवार रोजी शहरातील माजी सैनिक संघटना व सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने २६ जुलै कारगिल विजय दिवस हा क्रांती चौक परिसरातील मशाली जवळ साजरा करण्यात आला. विजयाची मशाल पेटवून कॅप्टन के. पी . शर्मा व रमेशराव काकडे, सखाराम महाजन यांनी विजय दिवस निमित्य घोषना देत हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहीली.या प्रसंगी रमेश काकडे म्हनाले की भारतीय सीमारेषेवर घुसखोरी केलेल्या पाकिस्तानाला २६ जुलै १९९९ साली भारतीय सैन्याने पिटाळून लावले. तब्बल अडीच महीने सुरू राहिलेल्या या युद्धात भारतीय जवानांनी पुन्हा एकदा मायभूमीवर तिरंगा फडकवला या युद्धात भारतीय सैन्याच्या ५२७ जवानांना वीरमरण आले होते.
या जवानांच्या बलिदानाची आठवण म्हणून २६ जुलै हा ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो.
आपल्या देश आणि देशवासियांच्या स्वाभिमान, इभ्रत आणि सन्मानासाठी आयुष्य समर्पित करणारे शुर सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना माझे सहस्र प्रणाम जय हिंद कॅप्टन जे . पी. शर्मा, रमेश काकडे,सखाराम महाजन, शिवाजी बेंद्रे, गंगाधर राऊत,सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड, अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुकाध्यक्ष सतीश जाधव, भा.ज.पा. शहराध्यक्ष कपिल फुलारी,विठ्ठल शिंदे,विठ्ठल ठाकूर,प्रकाश देऊळगावकर, दिनकरराव लिपणे,भुजंगराव कदम,लक्ष्मण कणकुटे,पुरण पुरभे, मारोती भिसे, भगवान भराटे,शिवाजीराव झोल,प्रसाद काकडे, बंडु तिवारी, पद्माकर कुलकर्णी, चंद्रकांत गंधम, संतोष बोराडे, आदि उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सखाराम महाजन यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांनी माणले


