डॉ.शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
सेलू.ता.27:येथील डॉ.बाबाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सेवा- निवृत्त प्रोफेसर डॉ.व्ही. के .देशपांडे-सारणीकर (वय ८८, रा.नंदनवन कॉलनी, छत्रपती संभाजीनगर) यांचे मंगळवारी, २५ जुलै रोजी निधन झाले. बुधवारी दुपारी एकच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर छावणी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा मकरंद, सून,नातवंडे असा परिवार आहे. सेलू (जि.परभणी) येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डी.के.देशपांडे यांचे ते वडील बंधू होत.
व्ही.के.देशपांडे मूळचे बीड जिल्ह्यातील सारणी येथील रहिवाशी होते.अंबाजोगाई येथील योगेश्वरी शिक्षण संस्था व पुढे नूतन विद्यालय शिक्षण संस्थेत विद्यार्थी प्रिय गणित शिक्षक म्हणून त्यांनी सेवा बजावली. जालना येथील महाविद्यालयात चार वर्ष प्राध्यापक म्हणूनही ते कार्यरत होते. अमेरिकेतील विस्कॉन्सिन मिलवॉकी विद्यापीठातून त्यांनी डॉक्टरेट पदवी संपादन केली व तेथेच काही काळ अध्यापनाचे कार्य केले. १९७८ मध्ये छत्रपती संभाजीनगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा मध्ये गणिताचे प्रोफेसर व पुढे विभाग प्रमुख म्हणून त्यांचे कार्य उल्लेखनीय राहिले.