नंदकुमार कावळे
तालुका प्रतिनिधी महागाव.
महागाव तालुक्यामध्ये ढगफुटी झाल्याने अतिवृष्टी निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या शेतामधील बांधा विहिरी शेतातील माती वाहून गेल्याने दुकान गोडाऊन दुकानांमध्ये पाणी शिरल्याने गावामधील नाल्याकडच्या घरामध्ये पाणी शिरल्यामुळे अतोनात प्रचंड असे नुकसान झाले त्याची पाहणी करण्यासाठी नव नियुक्त जिल्हाधिकारी पंकज आशिया यांना पाहणी करण्यासाठी जन आंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी भ्रमणध्वनी वरून विनंती केली त्या विनंतीस मान देऊन महागाव तालुक्यातील आंबोडा या गावी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर मजूरदारांच्या घरी पाहणी करून तालुक्यातील नुकसानग्रस्त एकही व्यक्ती वंचित राहणार नाही. जन आंदोलन आधार संघर्ष समितीने नुकसानग्रस्त लोकांचे अर्ज भरून घेतले त्या सर्व लोकांना अनुदान मिळेल त्यापैकी एकही वंचित राहणार नाही असे आदेश उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे तहसीलदार मुपडे मॅडम यांना जिल्हाधिकारी श्री पंकज आशिया यांनी सर्वांसमोर दिले त्यामुळे दुःख विसरून त्या ठिकाणी गावकऱ्यांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला त्याबद्दल जिल्हाधिकारी साहेबांचे गावकऱ्यांच्या वतीने आभार मानले यावेळी उपस्थित जगदीश भाऊ नरवाडे गावचे सरपंच बंडू मुनेश्र्वर विनोद खंदारे सचिन राऊत गजानन तायडे जगदीश सरकाटे तलाठी सविताबोबले मॅडम गणेश दादाराव ठाकरे भगवान गरडे अमोल राऊत व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते


