शहीद तथा माजी सैनिकांच्या परिवारांचा सन्मान…
अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी चे अध्यक्ष डॉ. सुगत वाघमारे यांच्या संकल्पनेतून कारगिल विजय दिनानिमित्त शहीद आणि माजी सैनिकांच्या परिवारांचा सन्मान सोहळा आळंदा येथील राजयोग मंगल कार्यालय येथे आयोजीत करण्यात आला होता.कारगिल युद्धामध्ये आपल्या प्राणांची आहुती देऊन आपल्या सीमांचे रक्षण करणाऱ्या शहिदांच्या या सन्मान सोहळ्यात सन्मान करतेवेळी डॉ. सुगत वाघमारे यांचे डोळे पाणावले होते, तर प्रत्येक शहीद परिवार आपल्या शहिदांच्या आठवणीने भारावून गेले होते, उर भरून आलेला होता, तोंडातून शब्द फुटत नव्हते आणि आठवणींना ओसंडून वाहण्यासाठी फक्त डोळ्यांचा मार्ग उरला होता.
सदर कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने माजी सैनिकांचे परिवार तसेच शहिदांचे परिवार सहभागी झाले होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारत मातेच्या प्रतिमेचे आणि अमर जवान ज्योत यांचे पूजन करून शहिदांना मौन पाळून श्रद्धांजली देण्यात आली. डॉ. सुगत वाघमारे यांच्यासह आजी-माजी सैनिक संघटनेच्या तसेच शहीद परिवारांच्या वतीने दीप प्रज्वलन करण्यात आले.कारगिल युद्धात आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी जे सैनिक शहीद झाले त्यांच्या परिवाराच्या सन्मान सोहळ्याला सुरुवात झाली, अतिशय भावनिक वातावरणामध्ये हा सन्मान सोहळा पार पडला.मधून मधून सेवन स्टार म्युझिकल ऑर्केस्ट्रा यांच्या देशभक्तीपर गीतांनी कार्यक्रमात रंगत आणली. तसेच अनबीटेबल ग्रुप या डान्स ग्रुपच्या वतीने देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर करण्यात आले. शाल सन्मानपत्र आणि सन्मान चिन्ह असे या सत्काराचे स्वरूप होते , सोबतच शहीद आणि माजी सैनिकांच्या परिवारातील गुणवंत विद्यार्थ्यांना मेडल व प्रमाणपत्र देउन गौरविण्यात आले.गेल्या तीन वर्षांपासून आजी माजी सैनिक संघटना अकोला अंतर्गतच हा संपूर्ण सोहळा साजरा करायचे पण, या वर्षी संस्थेने पुढाकार घेऊन ह्या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन स्वीकारले. विविध सैनिक संघटना या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. सुगत वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण तिक्ष्णगत टीमने अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव विष्णुदास मोंडोकार, एड. संजय सेंगर, एड.अनिता गुरव, श्रीकांत पिंजरकर यांचे मार्गदर्शन लाभले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुदन डोंगरे, उमेश शिरसाट, श्वेता शिरसाट, दिपाली बाहेकर, शरयू तळेगावकर, विद्या उंबरकर, सुचेति घोगरे, रोहित भाकरे, वैभव भदे , प्रतुल विरघट यांच्यासह संपूर्ण तिक्ष्णगत टीम ने अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जया भारती-इंगोले यांनी केले.