अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातूर – कापशी : पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम कपाशी येथे देशी दारूची वाहतूक करत असतांना एका आरोपीला रंगेहात अटक करण्यात आली असून सदरची घटना आज दि. 26 जुलै 2023 रोजी दुपारीच्या दरम्यान करण्यात आली.सविस्तर वृत्तानुसार, वाडेगाव येथील रहिवासी नंदू सुभाष वर्गे वय वर्ष 26 हा इसम अवैध देशी दारूची वाहतूक करत असल्याची गुप्त माहिती पातूर पोलिसांना मिळाली असता त्या ठिकाणी सापळा रचून आरोपी हा मोटारसायकल क्रमांक MH 30 BN 5664 ने अवैध देशी दारूच्या पेट्या नेत असतांना त्याला रंगेहात अटक करण्यात आली.त्याच्या जवळील 180 मिली चे 24 नग किंमत 1680,90 मि.लि.100 नग किंमत 3500, पल्सर मोटारसायकल किंमत 70900, एक मोबाईल असा एकूण 83,180 रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदरची कारवाई पातूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली ASI अरविंद पवार,रामानंद भवाने,विकास जाधव,निलेश राठोड यांनी केली.


