शेख इरफान
जिल्हा प्रतिनिधि यवतमाळ
महागाव दि.23 सतत 2 दिवस झालेल्या संततधार पावसामुळे महागाव तालुक्यातील आनंदनगर तांड्यावरील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून संबंधित ग्रामस्थांना तात्काळ आर्थिक मदतीसाठी खासदार हेमंत पाटील यांनी संबंधित अधिकारी यांना मदत मिळवून देण्याचे आदेश दिले आहेत. आनंदनगर तांड्यातील पूर्णपणे वाहून गेलेल्या तीन कुटुंबीयांना खासदार हेमंत पाटलांनी वैयक्तिक आर्थिक मदत केली असून शासनाकडून 2 दिवसात आर्थिक मदत तसेच गावाचे पुनर्वसन करण्याची ग्वाही खासदार पाटील यांनी दिली.
गावाचा वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला असून संबंधित विभागाशी संपर्क साधून तात्काळ वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले. ग्रामस्थांनी खासदार पाटील यांच्याकडे हिवरा येथील 12 एकर जागेत स्थलांतर करून द्यावे अशी विनंती केली असता तहसीलदार यांना सदरील प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आणि लवकरात लवकर आनंदनगर तांडावाशियांचे पुनर्वसन करण्यात येईल अशी ग्वाही दिली. अतिवृष्टीबाधित आनंदनगर तांड्यावरील नागरिकांचे लवकरच पुनर्वसन होणार असल्याने नागरिकांना धीर मिळाला आहे. अतिवृष्टीबाधित नागरिकांना धान्य पुरवठा करण्याचे आदेश खासदार पाटील यांनी दिले.
यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख चितांगराव कदम, उपजिल्हा प्रमुख डॉ. बी. एन. चव्हाण, न. प. महागाव गटनेते रामराव नरवाडे, तालुका प्रमुख राजू राठोड, सरपंच संघटना अध्यक्ष अमोल चिकने, तालुका प्रमुख संतोष जाधव, शहर प्रमुख अतुल मैड, युवासेना जिल्हा प्रमुख अविनाश कदम, शिवसेना तालुका संघटक कपिल पाटील, माजी नगरसेवक संदीप ठाकरे, रवी रुडे, युवासेना तालुका प्रमुख राम तंबाखे, उपतालुका प्रमुख पवन राठोड, एसडीएम काळबांडे, तहसीलदार संजीवनी मुपडे, कृषी अधिकारी चव्हाण मॅडम, ठाणेदार वानखेडे, दत्तराव कदम, ग्रामपंचायत सदस्य चायन राठोड जगदिश राठोड, दत्ता गाडेकर, संतोष राठोड, सुरेशिंग राठोड, विलास जाधव,संजू राठोड, अनिल जाधव सुभाष जाधव, विजू जाधव युवराज चव्हाण, धनराज राठोड, प्रवीण गावंडे उप तालुकाप्रमुख, अदित्य देशमुख, विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख अविनाश जाधव उप शहरप्रमुख, चयन राठोड विभाग प्रमुख, कुणाल राठोड उपसरपंच अनुप मीरासे, निखिल मोरथकर, धीरज ठाकरे आदी उपस्थित होते.