शेषराव दाभाडे
तालुका प्रतिनिधी ,नांदुरा
ओम साईं फाऊंडेशन म्हणजे संकटग्रस्ता करीता एक दिलासा,एक आशा होय.अपघाताचा प्रसंग असो की नैसर्गिक संकट असो ओम साईं चे मदत कार्य- सेवा कार्य हे कोणीही न सांगता सुरुच असते.ओम साईंचे सेवा कार्य पाहता आमदार राजेशजी एकडे यांनी ओम साईं या संस्थेला रुग्णवाहीका देवून त्यांच्या मदत कार्यात सहभाग घेतला.सद्यस्थिती मधे अतिवृष्टि ने प्रचंड अशी हानी झालेली आहे.अशा कठीन प्रसंगी आपत्ती ग्रस्त मदती करीता आशा ठेवून आहेत.या मदतीच्या कार्यामधे सहभाग घेत ओमसाई ने अकोला खुर्द येथे मदत कार्य केले. यामधे सर्वस्व नष्ट झालेल्या नागरिकांच्या मदती करीता छोटा आधार काय होईना त्या मधे किराणा कीट आणि कापड यांचे वाटप करण्यात आले.या नैसर्गिक आपत्ती मुळे आरोग्याच्या अनेक अडचणी समोर आल्या जे लोक सर्वस्व गेल्या मुळे शहरात दवाखान्या मधे येवू शकत नाही त्या करीता त्यांच्या सेवार्थ ओमसाई च्या मदत कार्यात डॉ परीक्षित मानकर ,(एम.डी. मेडिसीन) नांदुरा यांनी सहभाग घेतला आणि अकोला खुर्द येथे जाऊन रुग्ण तपासणी केली आणि औषध वाटप केले.ओमसाई चे सामाजिक कार्य सेवा कार्य हे सदैव जनमाणसाच्या आशिर्वादास पात्र ठरले आहे.आणि म्हणूनच जनतेतुन ओमसाई या सामाजिक संस्थेस अनेक रूपाने मदत मिळते ती मदत ओमसाई अशा सेवा कार्यात गरजवंता पर्यंत पोहचवते.म्हणून ओमसाई च्या पाठीशी ऊभे राहून होईल तेवढी मदत त्यांच्या माध्यमातून गरजवंता पर्यंत पोहचावी ही विनंती आपना सर्वाना करण्यात येत आहे.