अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
मालेगांव तालुक्यातील ब्राम्हणवाडा शिवारातील पुलाचा प्रश्र्न गेल्या 8 महिन्यापासून रखडला.लोकप्रतिनिधी गप्पका
मेडशी दि,14 मेडशी ते डव्हा पालखी रस्त्याला जोडणाऱ्या मोर्ना नदीवरील पुलाचे काम गत 8 महिन्यापासून रखडल्याने झालेल्या मुसळधार पाऊसामुळे चक्क नदीवरील रस्ताच नदीत वाहून गेल्याची घटना घडली आहे.रस्ता वाहून गेल्याने हा मार्ग बंद झाला आहे. सदर गंभीर प्रकरणात लोकप्रतिनिधी मात्र गंभीर नसल्याचे दिसत आहेत.मेडशी ते डव्हा पालखी रस्ता दर्जाहीन होत असून 2 वर्षांपासून काम कासव गतीने सुरू आहे.मेडशी ते डव्हा मार्गातील मोर्ना नदीवरील पूल तोडून 8 महिन्याचा कालावधी उलटूनही पूल बांधकामास प्रारंभ करण्यात न आल्याने कास्तकरासह ग्रामस्थांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे.अकोला लोकसभा मतदार संघातील शेगाव ते पंढरपूर रस्त्याचा महत्वाकांक्षी प्रकल्पाचे काम 2 वर्षांपासून कासव गतीने सुरू आहे. सदर प्रकल्प 248 कोटींचा आहे. नागपूर येथील मे. सुधीर कन्स्ट्रक्शन प्रा लिमिटेड कंपनीने कामाचे कंत्राट घेतले आहे. प्रकल्प मोठा असल्याने सुधीर कंपनीने रस्त्याच्या कामात विभागणी करून इतर कंत्राटदाराला काम दिलेले आहे. मेडशी ते डव्हा पालखी रस्त्याचे काम 2 वर्षात अनेक कंत्राटदारांनी केले आहे मात्र काम अपूर्ण अवस्थेत आहे.रस्त्याचे काम अर्धवट असताना सुधीर कंपनीने या मार्गातील मोर्ना नदीवरील पुलाची तोडतोड 8 महिन्यापूर्वी केली आहे. 2 महिन्याच्या कालावधीत पुलाचे काम पूर्ण करणार असल्याची ग्वाही कंत्राटदार महाजन यांनी येथील कास्तकर रहेमान गौरे यांना दिल्याने त्यांनी स्वतःच्या शेतातून तात्पुरती रस्त्याची व्यवस्था केली. 8 महिण्याचा कालावधी उलटूनही पुलाचे काम सुरू करण्यात आले नाही. पावसाळ्यात शेतातील गाळ वाहून जाण्याच्या भीतीने गौरे यांनी रस्ता बंद केला. नदीवर उभारण्यात आलेला रस्ताच झालेल्या मुसळधार पावसाने वाहून गेल्याने मेडशी ते डव्हा व इतर गावाला जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. पुलाचे डिझाईन तयार नसल्याचे सांगत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हात झटकले आहे. पुलाची डिझाइन तयार नसतांना संबंधित पुल तोडलाच कसा? असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे.सदर प्रकरणी संबधीत अधिकाऱ्यावर कार्यवाहीची मागणी होत आहे तर लोकप्रतिनिधी गप्प का?असा प्रश्न गावकऱ्यांनी केला आहे.