सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
सध्या शेतकरी पारंपरिक शेतीसोबत वेगेवेगळे प्रयोग शेतीमध्ये करताना दिसतात. मेहकर तालुक्यातील कासार खेड शेतकऱ्यांनी पेनटाकळी प्रकल्पामुळे
पारंपारिक सोयाबीन मुग उडीद शेतीला फाटा देत फ्लॉवरचे पीक शेतात घेऊन चांगला नफा ते मिळवत आहेत.
एक एकरात 16 हजार फुलकोबी (फ्लॉवर) च्या रोपांची लागवड केली. 1रू दराने फुलकोबी (फ्लॉवर) च्या रोपांची खरेदी करतात तर काही शेतकरी घरीच रोपे तयार करतात. फुलकोबी लागवड मे महिन्याच्या 15 तारखीपासुन एकरी 40 हजार रुपये खर्च करतात काही ड्रीपच्या सहाय्याने तर सरी पद्धतीने फुलकोबीला पाणी दिले जाते .मग दीड ते पावणे दोन महिन्यात फुलकोबीचे फुले काढण्यासाठी येतात . मोठ्या प्रमाणात सोयाबीन मुंग उडीद लागवड होत असल्याने मेहकर तालुक्यात कासारखेड गावातील शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीला फाटा देत शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्यास सुरुवात केली. मवाळ सवडतकर येथील शेतकऱ्यांनी फुलकोबीची (फ्लॉवर) शेती करत असून, यातून चांगला फायदा होत असल्याचे फुलकोबी उत्पादक शेतकरी सांगत आहेत.
दीड लाखांपर्यंतच्या उत्पन्नाची अपेक्षा
खामगाव अकोला नागपूर अमरावती मंगरूळ पिर डिग्रस पुसद इ मार्केटमध्ये फुलकोबीला मोठी मागणी आहे. एका फुलकोबीला (फ्लॉवर) किमान 15 रुपये दर मिळतो. आतापर्यंत एकरी 50 ते 60 हजार रुपये खर्च करण्यात आला.असुन एकरी 80/100क्विटल उत्पादन झाले असता फुलगोबीतून दीड लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळण्याची अपेक्षा या शेतकऱ्यांना आहे. खर्च वजा जाता आजच्या बाजार भावानुसार 1 लाख रूपयांचे निव्वळ उत्पन्न मिळण्याची आशा कासारखेड परिसरातील शेतकऱ्यांना आहे.











