सिध्दोधन घाटे
जिल्हा प्रतिनिधी बीड
बीड : दि. २५ जूलै २०२३ बीड येथील जिल्हा रुग्णालयात ह्रदयरोग तपासणी करण्यासाठी अत्याधुनिक अशा दोन मशिन उपलब्ध झाल्या असून या मशिनद्वारे जिल्ह्यातील सामान्य नागरिकांना अत्यंत कमी खर्चात जिल्हा रुग्णालयात ह्रदयरोग तपासणी करण्यासाठी मदत होणार आहे बीड येथील जिल्हा रुग्णालयात गेल्या वर्षभरात अनेक चांगले बदल होताना दिसत आहेत.बीड जिल्ह्यातील सामान्य नागरिकांना याचा मोठा फायदा होत असून रूग्णालयात रुग्णांची होत असलेली हेळसांड कमी होत आहे. गेल्या काही दिवसांपासून बीड येथील जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांचा मदतीने जिल्हा रुग्णालयात सर्वसामान्य नागरीकांना चांगल्या दर्जाचे उपचार मिळाले यासाठी शासनाकडून विविध योजना आणि सवलती आणि उपक्रम राबविण्यात येत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून बीड जिल्हा रुग्णालयात ह्रदयरोग तपासणी करण्यासाठी मशीन उपलब्ध नसल्याने नागरिकांना खाजगी रूग्णालयात ह्रदयरोग तपासणीसाठी १५००० रूपये मोजावे लागत होते. मात्र बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांच्या पुढाकाराने बीड येथील जिल्हा रुग्णालयात ह्रदयरोग तपासणी करण्यासाठी अत्याधुनिक टूडीईको आणि स्ट्रेस स्ट्रेस अशा दोन मशिन उपलब्ध करून दिल्याने जिल्ह्यातील सामान्य नागरिकांनाची खाजगी रूग्णालयात होत असलेली लूट थांबण्यास मदत होणार आहे या दोन्ही मशिनचे उद्घाटन करून चालू करण्यात आल्या आहेत.