डॉ.शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी
परभणी ता.19:जिल्हा परिषदे अंतर्गत माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी पदाचा पदभार हिंगोली येथील शिक्षणाधिकारी (योजना) श्री माधव सलगर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.यापूर्वी प्राथमिक शिक्षणाधिकारी या पदाचा पदभार परभणीच्या शासकीय अध्यापक महाविद्यालयातील अधिव्याख्याता गणेश शिंदे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला होता
तेथीलच अधिव्याख्याता मुरकुटे यांना माध्यमिक शिक्षणाधिकारी या पदाचा पदभार घ्यावा असे सुचविण्यात आले होते परंतु मुरकुटे यांनी तो पदभार स्वीकारला नाही दरम्यान माध्यमिक शिक्षणाधिकारी या पदाचा पदभार कोण्या सक्षम अधिकाऱ्यास सुपूर्त करावा याविषयी पेच निर्माण झाला होता. त्यातच छत्रपती संभाजीनगरचे शिक्षण उपसंचालक अनिल साबळे हे मागच्या आठवड्यात मंगळवारी परभणी दौऱ्यावर दाखल झाले होते,त्यावेळी साबळे यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी या पदाचा पदभार सलगर यांना घ्यावा अशी निर्देश दिले. परभणी जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी शिक्षण विभागातील तीनही शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी तसेच सर्व च गटशिक्षणाधिकारी या संवर्गातील पदे रिक्त आहेत.उपसंचालक अनिल साबळे यांचे आदेश मिळताच श्री माधव सलवार यांनी शिक्षणाधिकारी माध्यमिक पदाचा कार्यभार स्वीकारला.या प्रसंगी श्री सरस्वती विद्यालय गंगाखेड शाळेचे मुख्याध्यापक एल.एस.मादरपल्ले, मुख्य लिपिक ए. ए.पाठक,ग्रंथपाल बाळासाहेब निरस,प्रयोगशाळा सहाय्यक गजानन कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले.


