माबुद खान
तालुका प्रतिनिधी जिंतूर
जिंतूर: विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी जिंतुर आगाराने चारठाणा ते हलविरा मानव विकास बससेवा शनिवारी सुरु केली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये समाधान आहे.दरम्यान हलविरा येथून ४० ते ४५ शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी दररोज चारठाणा येथे ये जा करतात परंतु वाहन नसल्याने त्यांना दररोज पाटीपर्यंत पायी जाऊन बस धरावी लागते किंवा बस न मिळाल्यास अनेक विद्यार्थांना पाच कि.मी. अंतर पायी चारठाणा येथे जाऊन शाळा गाठावी लागते. या अनुशंगाने जिंतुर आगाराने चारठाणा ते हलविरा मानवविकास बस सुरु करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या जिंतूर तालुकाध्यक्ष संगीता जाधव यांच्यासह महिलांनी आगार प्रमुख एम. बी. जवळेकर यांच्याकडे निवेदनाव्दारे केली होती. दरम्यान, महामंडळाने सदर मागणीची दखल घेऊन हलविरा येथे शनिवारपासून बससेवा सुरू केली आहे. गावात बस आल्यावर चालक व वाहकाचा सत्कार करण्यात आला. यावेळी संगिता जाधव, सरपंच संपत राठोड, दिलिप राठोड, उपसरपंच मुकुंद नलभे, लिंबाजी नलगे, मोहन राठोड, गोविंद राठोड आदींची उपस्थिती होती.











