प्रकाश नाईक,
तालुका प्रतिनिधी अक्कलकुवा
अक्कलकुवा : मणिपूर येथील झालेल्या घटनेच्या निषेधार्थ दि. 26 जुलै 2023 रोजी अक्कलकुवा तालुका बंदचा इशारा केला आहे.
सविस्तर वृत्त असे की गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून मणिपूर येथे दोन गटात तेढ निर्माण होऊन वाद सुरू झाला असून येथे दोन महिलांची नग्न धिंड काढून त्यांच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा अमानुष प्रकार घडलेला असून हा प्रकार देशाच्या प्रतिष्ठेला बाधक आहे. अशा प्रकारची घटना घडणे म्हणजे देशाला कलंक लागण्यासारखे आहे. यासाठी अक्कलकुवा तालुक्यातील समस्त आदिवासी सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून दिनांक 26 जुलै 2023 रोजी अक्कलकुवा तालुका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहेत. अक्कलकुवा येथील तहसीलदार रामजी राठोड यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे. यावेळी उषा बोरा ,छोटूलाल पाडवी, वसंत वसावे ,आंबेसिंग पाडवी, अशोक पाडवी , पृथ्वीसिंग पाडवी,तुषार पाडवी, आनंद वसावे, ब्रीजलाल वसावे, राजेंद्र वसावे, विनोद वळवी, जी.डी. पाडवी, मगन वसावे यासह अनेक आदिवासी सामाजिक कार्यकर्ते आदी उपस्थित होते.