डॉ.शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
सेलू. ता.21: सेलू येथील हुसेन नगरातील रहिवासी तथा सैन्य दलातील हवालदार शेख गफार शेख संदल वय 39 यांच्या पार्थिवावर गुरुवारी रात्री पावणे बारा वाजता सेलू येथील कब्रस्तानात शासकीय इतमामात दफन करण्यात आले. हवालदार शेख गफार शेख संदल हे भारतीय सैन्य दलात हवालदार या पदावर कार्यरत होते. काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयात ते उपचार घेत होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते, उपचार सुरू असताना अखेरचा श्वास घेतला.दरम्यान त्यांच्या निधनाची वार्ता कळताच सेलू शहरावर शोककळा पसरली.रात्री उशिरा त्यांचे पार्थिव देह रेल्वेने शहरात आणण्यात आले.यावेळी शहरातील अनेक नागरिकांनी त्यांचे अंत्य दर्शन घेतले. 20 माजी सैनिकांनी देखील त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.