डॉ.शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
सेलू:जि .प. प्रा. शा. देऊळगाव गात तालुका सेलू येथील प्राथमिक शिक्षक कुंभार अशोक रामराव हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा मार्फत मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या राज्य पात्रता परीक्षेत( सेट )शिक्षण शास्त्र या विषयात उत्तीर्ण झाले आहेत. या अगोदर डिसेंबर 2022 मध्येही ते यूजीसी (नेट) शिक्षण शास्त्र या विषयात उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. त्यांना पत्नी अनिता बालाजीराव मुगुटकर- कुंभार (प्राथमिक शिक्षिका) यांचे सहकार्य लाभले. त्यांच्या यशाबद्दल शाळेतील शिक्षक श्री ढगे, शिंदे, रोडगे, लहाने, जाधव आदींनी त्यांचे अभिनंदन केले


