अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
भारतीय जनता पार्टीच्या वतीने आताच महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील जवळपास 70 जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली.त्यामध्ये वाशिम जिल्हाचा सुद्धा समावेश आहे.अतिशय काळजाचे ठोके वाढवनाऱ्या ह्या पदावर कोणाची नियुक्ती होते ह्याकडे जिल्ह्यातील सर्वच जनतेच्या नजरा होत्या. मालेगांव तालुक्यातील ग्राम रिधोरा येथील जि प सदस्य तसेच भाजपाचे जिल्ह्याचे आताचे महामंत्री असलेले श्याम दादा बढे यांची पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती झाली.त्यामुळे जिल्ह्यातील त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.अतिशय छोट्या अश्या रिधोरा या गावात श्याम बढे यांचा जन्म 13 डिसेंबर 1967 ला झाला. लहानपणापासूनच वडील स्व शेषराव बढे यांची राजकारणात असलेले कार्य पाहून त्यांनी आपण सुद्धा मोठे होऊन राजकारणात जायचे आणि समाजकारण करायचं असं मनाशी ठरवलं होतं.भारतीय जनता पक्षाचे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब हे त्यांचे बालपणीपासूनच प्रेरणास्थान आहे.”संघर्षातून विजय आणि विजयातून संघर्ष” ही त्यांच्यापासून त्यांनी घेतलेली शिकवण आजही ते अंगारून त्यांनी राजकारण कमी आणि समाजकार्य जास्त करताना दिसत आहे. वाणिज्य शाखेतून पदवीचे शिक्षण झालेले श्री श्याम शेषराव बडे यांनी परळी वैजनाथ साखर कारखाना येथे पंधरा वर्षे लेखपाल म्हणून काम केले. त्यानंतर रीधोरा जिल्हा परिषद सर्कल साठी आपले नशीब आजमावले असता पहिल्याच निवडणुकीमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.मात्र ते तिथंच खचून न जाता नव्या उमेदीने आणि जोमाने जनेतेचे कामे करत मेडशी जिल्हा परिषद सर्कल मधून निवडणूक लढवत विजय मिळवला.तिथूनच या विजयी उमेदवाराने कामाचा सपाटा आपल्या जिल्हा परिषद सर्कल मध्ये लावला. जिल्हा परिषद सदस्य असून करोडो रुपयाचे विकास कामे आपल्या सर्कल मध्ये करून त्यांनी आपले नाव जिल्ह्यामध्ये उमटवले.त्यानंतर पुन्हा मा जि प अध्यक्ष असलेले दिलीपराव जाधव यांच्या विरोधात त्यांनी राजुरा सर्कल मधून जिल्हा परिषद निवडणूक लढवत जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत सुद्धा विजय मिळवला.आता ते भारतीय जनता पार्टीचे महामंत्री असले तरी त्यांनी केलेल्या संघर्षामुळे, मेहनतीच्या जोरावर आणि तळागाळातील कार्यकर्त्याच्या जनसंपर्कामुळे आज वाशिम जिल्ह्याच्या भारतीय जनता पक्षाच्या सर्वोच्च अश्या अध्यक्ष पदावर वर्णी लागल्यामुळे त्यांनी पक्षाने आपल्याला न्याय दिला व शेवटच्या श्वासापर्यंत पक्षासाठी एकनिष्ठ राहून काम करू असे मत व्यक्त केले.