विज्ञान शाखेमध्ये 53 तर कला शाखेमध्ये 6 विद्यार्थी प्रथम श्रेणीत
अविनाश पोहरे / चिफ ब्युरो, पातूर
पातुर येथील महात्मा फुले कला व विज्ञान महाविद्यालय पातूर च्या विद्यार्थ्यांचा संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती पदवी वितरण समारंभ महाविद्यालयाचे सभागृहामध्ये पार पाडण्यात आला.
10 जुलै रोजी शनिवारी या पदवी प्रदान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्याचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा गोविंद भालेराव होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पातुर तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष देवानंद गहिले पत्रकार संघटनेचे कार्याध्यक्ष संजय गोतरकर डॉ धनंजय अमरावती कर डॉ.गजानन रोडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती यावेळी सर्वप्रथम मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये क्रांतीसुर्य महात्मा फुले व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करून दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले
याप्रसंगी देवानंद गहिले, डॉ. गजानन रोकडे ,डॉ.धनंजय अमरावती कर यांनी विचार व्यक्त केले आणि विद्यार्थ्यांना त्यांनी प्रेरणा व प्रोत्साहन देणारे शुभेच्छा व्यक्त केल्या तर अध्यक्ष भाषण प्रभारी प्राचार्य गोविंद भालेराव यांनी केले पदवीला ज्ञानाची जोड असल्याशिवाय जीवनाला तरणोपाय नाही आणि कष्टाविना फळ नाही असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
यावेळी विज्ञान शाखेतील अभिजीत गोपनारायण ,अजय गवई, आनंद वर्मा ,अंकुश मसने, कुमारी अक्सा खान, आसिफ हुसेन ,गोविंद करपे हरीश डांगे, कुमारी प्रांजली राखोंडे, कुमारी मदिहा नाज, कुमारी नाझिया परविन,रशीद खान,सौरभ जोशी, युवराज पाटील, कुमारी झेबा कौसर ,प्रतीक मसने, मोहम्मद नफीस यासह 61 पैकी 53 विद्यार्थी प्रथम श्रेणीत व कला शाखेतील गोपाल शिरसाट, मंगेश कोरडे, वैभव तेलगोटे, आम्रपाली किरतकार, जया कराळे, कोमल शिरसाट असे 6 विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना उपस्थित प्रमुख अतिथी यांच्या हस्ते पदवीचे वितरण करण्यात आले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ योगेश व्यवहारे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा प्रणीती खवणे आणि आभारप्रदर्शन प्रा पंढरी अंभोरे यांनी केले यावेळी कार्यक्रमाकरिता प्रा अमृता शिरभाते ,प्रा सुवर्णा डाखोरे, प्रा अस्मिता खाम्बरे ,प्रा सुनील चौधरी ,प्रा वसंत गाडगे, प्रा.अरविंद भोंगाळे, प्रा उज्वला मनवर, प्रा स्नेहा इंगळे आदींनी या कार्यक्रमाकरिता यशस्वितेकरिता अथक परिश्रम घेतलेत यावेळी कार्यक्रमाला प्राध्यापक वृंदा सह शिक्षकेतर कर्मचारी सुद्धा उपस्थित होते पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्राध्यापक वृंद आणि प्रमुख अतिथी प्रमुख पाहुणे आणि संस्थेकडून शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या आहेत.