अविनाश पोहरे / पातूर
पातुर: पातूर येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पातूरच्या वतीने राधाकृष्ण मंगल कार्यालयात कोरोना योद्धांचा सन्मान व हेल्मेट वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कोरोना कालावधीत आयुष्याची काळजी न घेता आपले कार्य निर्भीड पणे पार पाडणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, आरोग्य कर्मचारी आणि पत्रकारांना कोरोना योद्धा म्हणून शाल श्रीफळ आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.याच सोबत पत्रकारांच्या सुरक्षेसाठी हेल्मेटचेही वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. अंकुश वाकोडे आणि उद्घाटक संतोष खुमकर (उप कार्यकारी अभियंता, महावितरण) तर प्रमुख उपस्थिती मधुकर बावणे (सा अभय राज्य), हरीश गवळी (पोलिस निरीक्षक, पातूर), राहुल उंद्रे (ग्रामविकास अधिकारी शिरला), विजय सिंह गहीलोत (मा.प्राचार्य), संदीप पांडव (विभागीय अध्यक्ष एम. आर. पत्रकार संघ), सिद्धार्थ तायडे (विभागीय प्रमुख), गणेश सुरजुसे (जिल्हाध्यक्ष), स्वाती सुरजुसे (जिल्हा संघटक), ज्येष्ठ पत्रकार शंकरराव नभरे, आदी उपस्थित होते.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते तसेच साप्ताहिक अकोला संवादाचे संपादक मोहम्मद फरहान मोहम्मद निज़ाम यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना तर्फे कोरोना का काळातिल विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरव व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.पत्रकार मोहम्मद फरहान मोहम्मद निजाम यांनी कोरोना साथीच्या काळात अनेक सामाजिक कामे केली.
यावेळी देवानंद गहिले तालुका अध्यक्ष ,प्रा सी. पी. शेकुवाले,संजय गोतरकर, राजाराम देवकर, अब्दुल कदीर,श्रीधर लाड़, प्रा.साजिद हुसैन, नय्यर खान, अविनाश पोहरे,रक्षण देशमुख,रामहरि प्रल्हाद, सतीश कांबळे आदि पत्रकार उपस्थित होते.