पठाण जैद
तालुका प्रतिनिधि औसा
आ . अभिमन्यू पवार : नागरसोगा येथे सेवानिवृत्त सैनिकांचा सत्कार
भारतीय सैन्य दलात विविध संकटांना सामोरे जात देशाचे रक्षण करणारे जवान भारत मातेचे भूषण असतात . अश्या सैनिकांचा ज्या त्या गावाला अभिमान असतो . नागरसोगा गावचे दोन वीर सुपुत्र शशिकांत सौदागर मेलगर व प्रकाश घोडके तर दापेगावचे नेताजी लिंबाळकर यानी भारतीय सैनेमध्ये आपली सेवा साहसतापूर्वक संपन्न करुण सेवनिवृत झाले . या सेवानिवृत सैनिकांचा सत्कार करण्याचे भाग्य मला मिळाले . त्यामुळे मी द्यन्य झालो असे शब्द आ . अभिमन्यू पवार यानी नागरसोगा येथे सेवानिवृत सैनिकांच्या सत्कार प्रसंगी बोलताना व्यक्त केले .
नागरसोगा येथील दोन जवान आणि दापेगाव येथील एक जवान या तीन वीर जवानांचा सत्कार आ . अभिमन्यू पवार व अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला . या कार्यकमास उपस्थित सरपंच सरोज सूर्यवंशी भाजपचे तालुका अध्यक्ष सुभाष जाधव , संतोष मुक्ता , शिवाजी फावडे व गावातील सर्व सेवानिवृत सैनिकांचे कुटुंबिय व ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते . शेवटी आभार पंचायत समिति सदस्य दीपक चाबुकस्वार यानी केले .