भूमिपुत्र व उदयगिरी नेत्र रुग्णालय यांचा अभिनव उपक्रम
सचिन संघई जिल्हा प्रतिनिधी वाशिम
उदयगीरी नेत्र रूग्णालय उदगिर व भुमीपुत्र शेतकरी संघटनेकडून गेल्या सात ते आठ वर्षांपासून वाशिम जिल्ह्य़ातील रिसोड,मालेगांव, वाशिम तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये शेतकरी, शेतमजूर यांची मोफत नेत्र तपासणी, अल्पदरात किंवा मोफत चेष्मा वाटप तथा गरजु रूग्णांची नेत्र शस्त्रक्रिया आसे कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून सतत चालु आहेत. याच कामाची दखल घेत उदयगीरी नेत्र रूग्णालयाचे सर्वे सर्वा श्री लखोटीयाजी यांनी महाविर पवार व भूमिपुत्र च्या कामाची दखल घेत रिसोड येथे नेत्र रूग्णासाठी कायम स्वरूपी सेंटर दिले आसुन या सेंटर उद्घाटन सोहळा व त्या माध्यमातून गेल्याच आठवडय़ात शंभर रूग्णांचे यशस्वी व मोफत डोळ्याचे आॅपरेशन उदगिर येथुन करून आनले त्या शंभर रुग्णांचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रिसोड चे तहसीलदार अजित शेलार हे होते. तर उद्घाटक म्हणून भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर तर प्रमुख उपस्थितीत रिसोड पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री जाधव साहेब, भुमीपुत्र चे प्रवक्ते डाॅ. जितेंद्र गवळी, श्रीरंग नागरे, विकास झुंगरे, अनिल बाम्हणीकर, रविंद्र चोपडे, आर. बि.खडसे, रवि पाटिल जाधव, संजय सदार, पुरूषोत्तम रंजवे,व्ही.डि. देशमुख सर, संतोष गव्हाणे, संजय देशमुख, संतोष पाटील, श्याम अकमार यांची उपस्थिती होती. नेत्र रूग्णांन साठी सुरू केलेल्या सब सेंटर चे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर तहसीलदार यांनी भुमीपुत्र शेतकरी संघटना आणि महाविर पवार यांच्या कामाची स्तुती करून भुमीपुत्र ग्रामीण भागातील शेवटच्या माणसा पर्यंत पोहचत आसल्याचे कौतुक केले. या वेळी रिसोड चे ठाणेदार श्री. जाधव यांनी भुमीपुत्रला समाजसेवेसाठी सर्वोतपरी मदत करणार आसल्याचे सांगीतले. विष्णुपंत भुतेकर यांनी या पुढे तालुक्यातच नेत्र शस्त्रक्रिया करण्यासाठीचे प्रयत्न करणार आसल्याचे सांगीतले. उपस्थितीत शंभर च्या वर रूग्णांना अल्पोपाहार व चहा देवुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जितेंद्र गवळी यांनी तर उपस्थितांचे आभार विष्णुपंत भुतेकर मित्र परिवाराचे अध्यक्ष महाविर पवार यांनी मानले.











