महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती दि. 14:-आज दिनांक 12/07/2021 रोज मंगळवार ला आरोग्य शिबिर व नेत्र तपासणी शिबीर आणि चष्मे वाटप या कार्यक्रमास खापरी वार्डातुन सुरवात करण्यात आली मा. प्रशांत कदम शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख चंद्रपूर यांनी उद्घाटन करून शिव संपर्क अभिनयाची सुरुवात केली. दिनांक 12/07/2021 पासून दिनांक 27/07/2021 पर्यंत हा उपक्रम भद्रावती शहरातील एकूण 16 विविध वॉर्डांमध्ये राबवण्यात येणार आहे तसेच सदस्य नोंदणी करून शिवसेना शाखांची निर्मिती करण्यात येणार आहे तसेच विश्रामगृह येथे शिवसंपर्क अभियाना संदर्भात मा.प्रशांत दादा कदम शिवसेना चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख यांच्या नेतृत्वात आढावा बैठक घेण्यात आली या प्रसंगी नितीन मत्ते जिल्हाप्रमुख चंद्रपूर, रमेश मेश्राम शिवसेना उपजिल्हाप्रमुख चंद्रपूर, मुकेश जीवतोडे वरोरा तालुका प्रमुख, दिनेश यादव नगरसेवक वरोरा,भूषण बुरुले युवासेना तालुका प्रमुख वरोरा,नरेशा काळे तालुका संघटक भद्रावती, नंदू पढाल शिवसेना शहर प्रमुख भद्रावती, माया नारळे शहर संघटिका भद्रावती, ज्ञानेश्वर डुकरे, नगरसेवक राजू सारंगधर, महेश जीवतोडे,आशिष ठेंगणे, बाळा क्षीरसागर, सतीश आत्राम, घनश्याम आस्वले, राहुल खोडे, गौरव नागपुरे, प्रीतम देवतळे, वैभव मेश्राम आणि इतर महिला व शिवसैनिक उपस्थित होते.