वाढोणा येथील ‘हमारा गाव’ राजकीय पक्ष विरहित संघटनेची मागणी.
योगेश्वर शेंडे
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
नागभीड (१४ जुलै)- नागभीड तालुक्यातील वाढोणा परिसरातील वाढोणा,आकापूर खरकाडा,आलेवाही आदी गावांतील जंगलयुक्त शेती भागात पट्टेदार वाघाचा धुमाकूळ सुरु असून आकापूर,वाढोणा येथील दोन गुराख्यास सदर वाघाने ठार केले आहे.दरम्यान या नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा.अशी मागणी सोमवारी वाढोणा येथील ‘हमारा गाव’,राजकीय पक्ष विरहित संघटनेने वनविभागाला निवेदनातून केली आहे.वाढोणा परिसरातील वाढोणा,आकापूर,खरकाडा,
आलेवाही,जीवनापूर आदी जंगल प्रभावित गावांत रोवणीचा हंगाम मोठया प्रमाणात सुरु आहे.अशा परिस्थितीत वाढोणा,आकापूर येथील दोन गरीब गुराख्यास सदर वाघाने ठार केले.तर खरकाडा येथील गुराखी व वाढोणा येथील एका धनगर समाजाच्या तरुणास गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे.शिवाय शेतकऱ्यांच्या अनेक शेळ्या,मेंढया,जनावरं वाघानी फस्त केले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांची मोठया प्रमाणात आर्थिक हानी झाली आहे.आणि सतत हा वाघ. कुठे ना कुठे नागरिकांना आढळत आहे. त्यामुळे वाढोणा परिसरातील अनेक गावांतील शेतकरी,शेतमजूर,आणि नागरिक वाघाच्या भीतीने धास्तावले आहेत. अतिशय जंगलात शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यानी अजूनही रोवणी केलेली नाही. लोकांनी वनक्षेत्रात अतिक्रमन करून चराई क्षेत्र नष्ट केलेले आहे. तरी वन विभाग गप्प का राहतो.असा प्रश्न यावेळी संघटनेनी उपस्थित केला आहे. यामुळेच गुराख्यांना जंगल भागात जनावरांना चराई साठी न्यावे लागते. परिणामी दोन गुराख्यांना त्यांच प्राण गमवावे लागले. आमच्या दृष्टीने जंगली स्वापदांपेक्षा नागरिकांचा जीव महत्वाचा आहे.म्हणून सदर नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी हमारा गाव संघटनेनी केली असून वनपरिक्षेत्र अधिकारी, वन विभाग तळोधी यांच्या मार्फतीने उपविभागीय वनसंरक्षण अधिकारी, वन विभाग ब्रम्हपुरी यांना निवेदनातून करण्यात आले आहे. याप्रसंगी शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष रुपेश डोर्लीकर,मल्लाजी कन्नावार, संजय गहाणे,बिराजी कोमावार,प्रमोद ठाकूर,विनोद आंबोरकर,खुशाल वाढई,आकाश पालकर,समीर सूर्यवंशी,सचिन कामडी,बाबाजी भीमनवार,बंडू निकोडे,अरुण देवतळे, अक्षय बनवाडे यांची उपस्थिती होती.
“मनुष्याच्या रक्ताची चव लागलेल्या नरभक्षक वाघाला वनविभागाने त्वरित जेरबंद न केल्यास गावकरी तथा हमारा गाव संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”
रुपेश डोर्लीकर अध्यक्ष – “हमारा गाव,राजकीय पक्ष विरहित संघटना,वाढोणा ता.नागभीड”










