७८ रक्तदात्यांनी केले रक्तदान.
योगेश्वर शेंडे
उपजिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर
चिमूर (१४ जुलै)- चिमूर येथे पंचायत समिती चिमूर ,महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन शाखा चिमूर व लोकमत रक्ताचे नाते तर्फे रक्तदान तर्फे जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपुर यांचे विद्यमाने स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीचे औचित्य साधून बुधवारला पंचायत समिती सभागृहात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये चिमुरातील अधिकारी कर्मचाऱ्यानी सामाजिक बांधीलकी जोपासत लोकमत रक्तांचे नाते या अभियानाला उदंड प्रतिसाद देत ७८ रक्तदात्यांनी रक्तांचे नाते जोपासले. “रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे हे पुण्याचे काम” लोकमत परिवार करीत आहे. कोरोनाच्या जागतिक महामारीच्या कठीण काळात रक्ताची रुग्णांना खूप मोठी गरज असते व अश्या कठीण काळात लोकमत वृत्तपत्र समृह तर्फ पंचायत समिती चिमूर येथील सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमांचे अध्यक्ष लताताई पिसे पंचायत समिती सभापती, उद्घाटक डॉ.सतीश वारजुरकर जि. प. गटनेता, प्रमुख अतिथी गजानन बुटके जि.प.सदस्य, धनंजय साळवे संवर्ग गटविकास अधिकारी पं. स. चिमूर, भावना बवनकर पं स.सदस्य ,शांताराम सेलवटकर तालुका वैद्यकिय अधिकारी, दिगांबर मेश्राम, पुनम गेडाम प्रकल्प अधिकारी, मेश्राम गट शिक्षण अधिकारी, मंजुषा डोरे ग्राम सेवक युनियन अध्यक्ष, राजकुमार चुनारकर, अमोद गौरकार उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन विषय तज्ञ संजय पंधरे केले तर आभार प्रदर्शन संजू ठाकरे यांनी मानले. या कार्यक्रमाला राजकुमार चुणारकर, आमोद गौरकार, ज्ञानेश्वर शिरभये प्रकाश पाटील ,विकास खोब्रागडे यांनी सहकार्य केले. लोकमत वृत्त पत्र समूहतर्फ रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र ,बॅग देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी लोकमत वृतपत्र समूह व पंचायत समिती चिमूर च्या सहकार्याने ७८ रक्तदात्यांनी रक्तदात्यांनी शिबिरात सहभाग घेऊन सहकार्य केले.











