अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
दिनांक शनिवार संध्याकाळी मौजे मारसुळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक चावडी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते श्री दामूआण्णा इंगोले यांची महाराष्ट्र प्रदेश युवक प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार संभारभाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी मा श्री संरपच अंगद प्रदिपराव घुगे व प्रमुख पाहुणे श्री संदिप विजयराव घुगे पोलिस पाटील व तसेच जेष्ठ ग्रांम पंचायत सदष्य श्री प्रकाशव कुष्णराव घुगे यांच्या हस्ते नवनिर्वाचित युवक प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्री दामूआण्णा इंगोले यांचा पुष्पगुच्छ शालश्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी दामूआण्णा इंगोले यांनी मागील वर्षी सन २०२२-२३मध्ये येथील शेतकऱ्यांना पंतप्रधान मंत्री पिक विमा नुकसान भरपाई अंदाजे ९०लक्ष रूपये मिळाले.यावेळी येथील शेतकरी माझ्या सोबत पिक विमा मोर्चा प्रत्यक्ष उपस्थित राहले याबद्दल त्यांनी सर्वाचे आभार व्यक्त केले. व तसेच सन २०२३-२४सालामध्ये प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतीचा पिक विमा उतरवावा त्यांनी १ रूपये नोंदणी रजिस्टर करावे जेणेकरून भविष्यात नुकसान झाले तर नुसकान भरभाई मिळेल.व तसेच ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदत पिकविमा कर्जमाफी विधुत कनेक्शन व शेतकऱ्यांना काही अडचणी आल्यास त्यांनी मला प्रत्यक्ष भेटू घ्यावी आपल्या मागण्या करीता उपस्थित राहिले असे आश्वासन त्यांनी दिले. व माझा सत्कार केल्याबद्दल आपला ऋणी राहील असे सांगितले. यावेळी कार्यक्रमाला राजू वसंतराव घुगे,शामराव संपतराव घुगे, सुर्यकांत उद्वराव घुगे, विजयराव सांगळे,रंजन घुगे,मदनराव घुगे,दत्तप्रभू घुगे, कुंडलीकराव घुगे, भास्करराव घुगे, सदाशिवराव घुगे,भगवानराव घुगे, महादेवराव घुगे,दिनकरराव सांगळे, डिंगाबरराव घुगे,निवासराव घुगे,गणेश माणिकराव घुगे, डिलर वासुदेवराव घुगे,माणिकराव भेंडेकर,सुधाकर घुगे, गोपाल बळीराम घुगे,दयाराम भेंडेकर, धन्यकुमार नागरे, जयवंत घुगे,पांडुरंग घुगे,प्रमोद जयसिंगराव सांगळे,शाम गजाननराव घुगे,अनिल भेंडेकर, राधेश्याम घुगे, नितीन गिरी,अनिल प्रतापराव घुगे,निलेश जयसिंगराव घुगे, अनिल माणिकराव घुगे,निलेश चंद्रकांतराव घुगे, योगेश घुगे ,मंगेश घुगे, दिलीप भेंडेकर सह गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पांडुरंग बळीराम घुगे यांनी केले.