शेख इरफान
जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
आज पोखरी ता महागाव येथे भाविक भाऊ भगत यांनी भेट दिली असता यावेळी गावकऱ्यांच्या वतीने भाविक भाऊ भगत यांचा पोखरी ग्रामपंचायत कार्यालय येथे स्वागत सत्कार करण्यात आला.तसेच हेल्प फाऊंडेशन युवा ब्रिगेडच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचा सुद्धा स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महंत जगदीश बाबा गिरी प्रमुख पाहुणे म्हणून हेल्प फाऊंडेशन युवा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष भाविक भाऊ भगत जिल्हा उपाध्यक्ष विष्णू भाऊ चौधरी तालुका अध्यक्ष अपंग संघटना प्रेमानंद भाऊ पांचाळ तालुका समन्वयक विनोद भाऊ भोयर शाखा प्रमुख पोहंडूळ विनोद भाऊ सोळंके विष्णू भाऊ राठोड आदर्श शिक्षक प्रमोद गायकवाड सर गजानन भाऊ पांडोळे शाखा प्रमुख मा प्रल्हादजी नरवाडे मा उत्तमरावजी गंड माजी उपसरपंच डी.के.राठोड ( नाईक ) सारंग दवणे कुंदन जी पाटील माधवरावजी लोंढे गणेश भोपळे या कार्यक्रमाचे आयोजन व सुत्र संचालन विशाल जाधव सर यांनी केले.
यावेळी भाविक भाऊ भगत यांच्या हस्ते आदर्श शिक्षक प्रमोदजी गायकवाड सर यांचा सन्मान सत्कार करण्यात आला.
त्यानंतर भाविक भाऊ भगत यांनी हेल्प फाउंडेशनच्या कार्याबद्दल समस्त गावातील नागरिकांना माहिती दिली कुठल्याही प्रसंगी कुठल्याही प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी हेल्प फाउंडेशन समस्त पोखरी ग्रामवसीयांच्या पाठीशी उभे राहील गावातील वंचित पीडित शोषित लोकांना न्याय देण्याचे काम यावेळी हेल्प फांऊडेशन करेल जनतेच्या कामासाठी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नेहमी तत्पर राहतील आरोग्य शैक्षणिक सामाजिक कुठल्याही क्षेत्रातील समस्या असो हेल्प फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क करावा हेल्प फाउंडेशन हे गरजू लोकांच्या मदतीसाठी आरोग्य सेवेसाठी समाजसेवेसाठी निस्वार्थपणे आज संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे गावांचा सर्वांगीण विकास व्हावा लोकांना न्याय मिळावा लोकांची अडकलेली कामे पूर्ण व्हावी कुठलाही व्यक्ती त्याच्या हक्कापासून वंचित शोषित पीडित राहू नये या सर्वांसाठी आज हेल्प फाउंडेशन कार्य करत आहे.असे भाविक भाऊ भगत यांनी सागितले