विश्वास काळे
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड :तालुक्यातील एंकाबा या आदिवासी बहुल गावामध्ये आज सामाजिक कार्यकर्ते किशोर दादा भवरे यांनी तेथील गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप केलं. सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले दलित मित्र आरोग्य दूत अशी ख्याती असलेले श्री किशोर भवरे हे नेहमीच महागाव उमरखेड क्षेत्रामध्ये आर्थिक दुर्बल घटकातील रुग्ण व विद्यार्थी यांना मदत करण्यासाठी तत्पर असतात. त्याच अनुषंगाने आज जिल्हा परिषद शाळा एकम्बा येथे त्यांनी विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचा वाटप करून, एक सामाजिक दायित्व जोपासला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा शैक्षणिक बाबतीमध्ये मागासलेले राहू नये .त्यांनी सुद्धा आपले स्वप्न पूर्ण करावी असे त्यांनी या वेळेस असा प्रसार माध्यमांना बोलताना सांगितले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकंबा येथील शाळेच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व देऊन विद्यार्थ्यांना शाळेचे बॅग वाटप करण्यात आले. व वय वृध्द लोकांना चास्म्याचे वाटप किशोर भवरे यांच्या कडून करण्यात आले .यावेळी गावातील प्रतष्ठित नागरिक अकातराव आडे ग्राम पंचायत सदस्य, संतोष दत्तराव पांडे माजी सरपंच, बालाप्रसाद फुटलवाड पोलीस पाटील, आकाश पांडे, वसंतराव गवाडे, देवकाबई गायकवाड, वछलाबाई गायकवाड, सोनबा गायकवाड सोनबा गायकवाड सावित्रीबाई गायकवाड आदी उपस्थित होते.