सुनिल गेडाम
तालुका प्रतिनिधी सिंदेवाही
लाडबोरी: सिंदेवाही वनपरीक्षेत्र ( प्रादेशिक) वन विभागाच्या कक्ष क्रमांक 1281 च्या लाडबोरी गावाजवळ आंबोली पांदण रस्त्याच्या बाजूला बैलाला पट्टेदार वाघाने ठार केले आहे,सदर घटना आज दिनांक 16/07/2023 रोजी दुपारी अंदाजे 1: 30 वाजता घडली आहे, लाडबोरी गावातील काही शेतकरी वर्गाचे शेत असल्याने ते नेहमीच या पांदण रस्त्याने येणे जाने करीत असतात,सध्या शेतीचा हंगाम सुरु असलेल्या या रस्त्याने शेतकरी वर्ग नेहमीच जाने येणे करतो,नेहमी प्रमाणे राजु रामचंद्र उईके वय 41 वर्ष यांनी आपल्या शेताकडे चराई करण्याकरिता आपली गुरे नेत असताना त्या मधील एका बैलावर पट्टेदार वाघाने हल्ला चढवीत जागीच ठार केले व ओढत झुडपात घेऊन गेला, बैल मारल्याची बातमी गावात पसरताच घटनास्थळी गावातील नागरिक जमा झाले व याबाबत वनविभागाला कळविण्यात आले,सदर ठिकाणी वन विभाग बिट वनरक्षक श्री बडवाईक आपल्या टीम सोबत हजर राहून घटना स्थळाचा पंचनाम केला,शेती हंगाम च्या वेळेत वाघाने बैलाला ठार मारल्याने शेताकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे तरी शेतीचा हंगाम असल्याने वन विभागाकडून शेताकऱ्याला लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहे.