नंदकुमार कावळे
तालुका प्रतिनिधी महागाव
आज 16/07/2023 रविवारला अमृतेश्वर संस्थान श्री महादेव मंदिर हरदडा येथे भारतीय जनता पार्टी उमरखेड/महागाव विधानसभेच्या वतीने मोदी @9 अभियान अंतर्गत टिफिन (सहभोजन) बैठक आमदार नामदेवराव ससाने यांच्या उपस्थितीत संपन्न झाली यावेळी आमदार ससाने यांनी मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल केंद्र सरकारच्या विविध योजनांची यावेळी माहिती दिली.व राज्यातील महायुती सरकारचा अर्थसंकल्प सर्वसामान्य करिता कसा उपयुक्त आहे,याची माहिती दिली. येणाऱ्या काळामध्ये शक्ती केंद्र प्रमुख, बुथ प्रमुख भाजपा कार्यकर्त्यांनी मतदार नोंदणी,सरल ॲप,केंद्र सरकारला पाठिंबा देण्याकरिता 9090902024 या क्रमांकावर मिस कॉल देण्याचे आव्हान कार्यकर्त्यांना केली.यावेळी भाजपा महागाव तालुकाध्यक्ष दीपक आडे, महागाव नगरपंचायतचे उपाध्यक्ष सुरेश पाटील नरवाडे,तालुका सरचिटणीस योगेश वाजपेयी,महागाव शहराध्यक्ष निलेश पाटील नरवाडे व उमरखेड आणि महागाव तालुक्यातील पदाधिकारी शक्ती केंद्रप्रमुख बूथ प्रमुख मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.


