प्रकाश केदारे
तालुका प्रतिनिधी, पाथरी
पाथरी : मागील बऱ्याच दिवसापासून पाथरी शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट वाढलेला असून शहरातील जुना आठवडी बाजार श्रीराम मंदिर परिसर ते बस स्थानक या मुख्य मार्गावर तसेच शहरातील गल्लीबोळा त मोकाट जनावरांचे कळप फिरताना दिसून येत आहेत ही मोकाट जनावरे आपापसात मारामारी करून हैदोस घालत आहेत त्यामुळे वाहतुकीस मुख्य रस्त्यावर अडथळे निर्माण होतात मोकाट जनावरामुळे लहान मोठे अपघात नेहमीच घडत आहेत तसेच ही जनावरे नागरिकांच्या अंगावर जाऊन हल्ला करत आहेत यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण होत आहे रस्त्यावर फिरत असलेल्यांना जनावरामुळे विद्यार्थी वाहनधारक वयोवृद्ध नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे ही जनावरे शहरा नजीक असलेल्या शेत शिवारातील पिकांची नास धूस रात्रीच्या वेळी करत आहेत त्यामुळे शेतकरी सुद्धा आर्थिक संकटात येत आहेत तरी या मोकाट जनावरांचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा व रस्त्यावर मोकाट जनावरे सोडणाऱ्या मालकांवर त्वरित कारवाई करण्यात यावी अशा विषयाचे निवेदन मा. मुख्याधिकारी नगरपरिषद पाथरी यांना देण्यात आले. निवेदनावर अभिजीत पाटील ,दीपक नाईक, श्रीकांत पाटील, अजय नाईक, लक्ष्मीकांत कुऱ्हाडे, ऋषिकेश नाईक आदींच्या सह्या आहेत.


