मधुकर केदार
शहर प्रतिनिधी,शेवगाव
शेवगाव:आज दि 14.7.2023 कर्मयोगी आबासाहेब काकडे जयंती माह निमित्त आबासाहेब काकडे विद्यालय,शेवगाव येथे इ 5 वी ते इ 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.इ 5वी ते इ 6वी चा पहिला गट- या गटासाठी चित्राचे दोन विषय देण्यात आले होते.कर्मयोगी आबासाहेब व झाडे लावा झाडे जगवा संदेश चित्र या गटात एकूण 119 विद्यार्थी सहभागी झाले होते,इ 7वी ते इ 8वी चा दुसरा गट या गटासाठी दोन विषय देण्यात आले होते. कर्मयोगी आबासाहेब व त्यांच्या जीवनातील एक प्रसंग तसेच प्रदूषण एक समस्या संदेश चित्र या गटात एकूण 53 विद्यार्थी सहभागी झाले होते,इ 9वी ते इ 10वीचा तिसरा गट या गटासाठी कर्मयोगी आबासाहेब यांचे व्यक्तिचित्र असा विषय देण्यात आला होता या गटात एकूण 17 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.या स्पर्धेसाठी विद्यालयातून इ 5वी ते इ 10वीचे एकूण 189 विद्यार्थी सहभागी होऊन वेगवेगळ्या विषयावर चित्र काढण्यात दंग झाली होती.अतिशय सुंदर अशा चित्रकृती विद्यार्थ्यांनी निर्माण केल्या.
या विद्यार्थ्यांना कलाशिक्षक शितलकुमार गोरे यांचे मार्गदर्शन लाभले.यावेळी विद्यालयाचे प्राचार्य संपतराव दसपुते, उपमुख्याध्यापिका सौ. मंदाकिनी भालसिंग,पर्यवेक्षिका श्रीम पुष्पलता गरुड यांनी या चिमुकल्या चित्रकारांचे अभिनंदन व कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी ज्ञानेश्वर गरड,सागर देहाडराय हे उपस्थित होते.