कैलास खोट्टे
तालुका प्रतिनिधी संग्रामपूर
संग्रामपूर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या वरवट बकाल येथे महाराष्ट्र नवनिर्माण नवनिर्माण सेनेतर्फे स्वाक्षरी निषेध मोहीम राबविण्यात आली. या योजनेला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. राज्यातील सध्याच्या राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर वरवट बकाल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात संपर्कप्रमुख विठ्ठलराव लोखंडकर, जिल्हाध्यक्ष मदनराजे गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष विनोद टिकर यांच्या नेतृत्वाखाली संग्रामपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तालुकाध्यक्ष शिवा पाटील खोंड. यावेळी मोठे फ्लेक्स लावण्यात आले.यावर नागरिकांनी सह्या करून संताप व्यक्त केला. त्यातून लोकांचे मतही जाणून घेतले. यावेळी मनसे तालुकाध्यक्ष शिवा पाटील खोंड, तालुका उपाध्यक्ष अरुण धर्माळ, मोहन धामोडे, सोनाळा शहरप्रमुख पवन शेंडे, भास्करराव चोरे, उमेश पाखरे, राजू टाकळकर, अशोक दामधर शुभम चिकटे, राजेश धुरडे, विठ्ठल पिंजरकर, सचिन आदी उपस्थित होते.


