शेख इरफान
जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
उमरखेड : छत्तीसगडतुन मराठवाड्यात जाणारा लाखो रुपयांचा गुटखा नागपूर तुळजापूर महामार्गावर शहराजवळील नागेशवाडी गावाजवळ स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी पकडला ही उमरखेड मधील आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई असून यामध्ये 34 लाख दहा हजार रुपयांचा गुटखा व पंधरा लाख रुपयाचे आईचेर वाहन असा एकूण 49 लाख दहा हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून या कारवाईमुळे परप्रांतीय गुटखा तस्करीचे रॅकेट उघडकीस येणार असल्याने गुटखा तस्करामध्ये खळबळ निर्माण झाली आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मध्य छत्तीसगडतील रायपूर येथून गुटखा मराठवाड्यात जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना गुप्त माहितगाराकडून प्राप्त झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सदर वाहनाचा यवतमाळ येथून पाठलाग केला सदर वाहन उमरखेड जवळ नागेशवाडी येथे आले असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना अडवले व वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये मागच्या साईडला कोंबडीला लागणाऱ्या मक्याचे चारा ठेवण्यात आला होता त्याच्यामधे गुटख्याचे होते आढळून आले पोलिसांनी सदर वाहन ताब्यात घेऊन उमरखेड येथील पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीमध्ये आणला या प्रकरणात पोलिसांनी छत्तीसगड राज्यातील भिकम राम साहू राहणार गोरडी, जिल्हा राजनांदगाव व विवेक कुमार साहू राहणार बोधली जिल्हा राजनांदगाव या दोन आरोपींना अटक केली आहे. सदर कार्यवाही झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाला पाचारण करण्यात आले त्यानंतर सर्व कारवाईला सुरुवात करण्यात आली सदर कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक पवन कुमार बनसोड ,अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक पियुष जगताप ,उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोणे अन्न व औषधे प्रशासन अधिकारी अमितकुमार उपलप ,सहायक पोलीस निरीक्षक अमोल सांगळे ,विवेक देशमुख पोलीस हेड कॉन्स्टेबल सुभाष जाधव, तेजाब रणखांब ,राहुल गोरे ,पोलीस नायक कुणाल मुनेश्वर, सोहेल मिर्झा, मोहम्मद ताज, सुनील पंडागळे ,दिगंबर गीते यांनी सदर कारवाई पार पडली.
चौकट
सदर गुटका हा मध्य छत्तीसगड राज्यातून येत असलेले मराठवाड्यामध्ये जात असून या गुटखा तस्करीचे धागेदोरे नागपूर मध्ये असून सदर गुडका सुरक्षितपणे पोहोचवण्याची जबाबदारी नागपूरचे तस्कर सांभाळतात त्यामुळे या गुटखा तस्करी मागे परप्रांतीय रॅकेट असून या कारवाईमुळे हे परप्रांतीय रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे परवा उमरखेड तालुक्यातील बिटरगाव पोलीस स्टेशन मध्ये मराठवाड्यातून विदर्भात येणारा गुटखा सुद्धा जप्त करण्यात आला होता त्यामुळे गुटखा तस्करांच्या मुसक्या आवळल्या जाणार का हा प्रश्न निर्माण होत आहे.