फैय्याज इनामदार
तालुका प्रतिनिधी जुन्नर
कल्याण नगर महामार्गावर असलेल्या डुंबरवाडी टोलनाक्याच्या परिसरात आझादीच्या अमृत मोहोत्सवा निमित्ताने नॅशनल हायवेच्या वतीने भविष्यात सर्वांना उपयुक्त ठरतील अशा विविध झाडांचे वृक्षारोपण ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते करून एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केला आहे.या परिसरात सर्वांनी सामूहिक पद्धतीने स्वतः परिश्रम घेत विविध वृक्षांचे वृक्षारोपण केले व त्याचे संगोपनाची जबाबदारी स्वीकारली आहे. वड, सिसम,निलगिरी, बकुळ,बेल, आपटे आदी प्रकारच्या झाडांचे रोपण या वेळी करण्यात आले आहे.यावेळी पोलीस कर्मचारी सखाराम जुंबड तसेच नॅशनल हायवेचे अधिकारी वर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश बागल यांनी केले तर आभार दीपक गुंजाळ यांनी मानले.