शेख इरफान शेख इसाक
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
दिनांक 11 जुलै रोजी ठाणेदार सुजाता बनसोड यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून बिटरगाव पोलिसांनी सोईट महागाव येथे सापळा रचून हिमायतनगर येथून येणारा एक लाल अप्पे मालवाहू ऑटो संशयितरित्या ढाणकी कडे येताना पोलिसांना आढळला.तेव्हा चौकशीसाठी मालवाहू ऑटो थांबवला असता त्यात महाराष्ट्र शासनाने प्रतीबंधित केलेला गुटखा आढळला. तेव्हा पोलिसांनी अब्दुल वाजिद अब्दुल करीम वय 50 वर्ष , सय्यद आमिर सय्यद खमर वय 40 दोघेही राहणार हिमायतनगर यांच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईमध्ये मालवाहू ऑटो ची किंमत धरून अंदाजे 599600 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्हीही आरोपीवर भांदवी कलम 188, 272, 273, 328 सहकलम 59, 26(2), 27, 30( 2) (अ ), कलम 59 प्रमाणे गुन्हा नोंद केला. पुढील तपास पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सुजाता बनसोड, उपनिरीक्षक शिवाजी टेंभुर्णे, पोलीस जमादार मोहन चाटे , निलेश भालेराव, प्रवीण जाधव, देविदास हाके, होमगार्ड चंद्रमनी वाढवे करीत आहेत. या कारवाईमुळे गुटखा व्यावसायिकांचे चांगलेच धाबे दनानले असून यामुळे काही प्रमाणात तरी गुटखा तस्करीला आळा बसेल असे नागरिकांचे म्हणणे आहे.


