मुकेश मेश्राम
जिल्हा प्रतिनिधी भंडारा
भंडारा : जिल्ह्यात कार्यरत असलेले युथ फॉर सोशल जस्टिस या सामाजिक संघटने द्वारे दिनांक 6 जून 2023 रोजी सहकार नगर भंडारा येथे साऊ स्टडी सेंटरच्या शुभारंभ करण्यात आला होता ही फक्त एक अभ्यासिका नसून या ठिकाणी विद्यार्थ्यांना वेळोवेळी उच्च शिक्षण व सोबतच करियर संबंधित मार्गदर्शन देण्याचे नवीन उपक्रम स्टडी सेंटरच्या माध्यमातून संघटनेने सुरू केले आहे.दिनांक 11 जुलै 2023 रोजी संघटनेतर्फे साऊ स्टडी सेंटर येथे चांदणी सरिता शेंडे जिने तिच्या जिद्दीच्या जोरावर प्रथम प्रयत्नातच महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून पोलिस उपनिरीक्षक हे पद मिळवले त्याबद्दल तिच्या सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले व सोबतच कुमारी चांदणी हिने तिच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग खडतर प्रवास तिने कसा गाठला हे देखील तिने सांगितले. साऊ स्टडी सेंटर मध्ये हा सलग दुसरा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला यावेळी विशाल राखडे, पंकज पडोळे अक्षय लुटे,जितेंद्र कोसरे,अंकुश पंचबुधे, आशीष कडव,भारती निखाडे सेजल सार्वे ,सचिन करंडे, आचल कडव ,नेहा भुरे, शुभम वंजारी, तुलसी मेश्राम, नेहा वंजारी, प्रिया पाटील,मयूर नगरधने, मोनल मोहनकर, रोहिणी भुरे ,समीर भुरे,इत्यादी विद्यार्थी उपस्थित होते.